लहानपणी रामाने केलेला अश्वमेध हि कथा अनेक वेळा आईकली होती. दिग्विजय करण्यासाठीचा सर्वोच्च यज्ञ म्हणजे अश्वमेध! यज्ञ करायचा आणि यज्ञाच्या अश्वाला सोडायचे पृथ्वी जिंकायला. जिथे जिथे तो अश्व जाईल त्या त्या ठिकाणच्या राजाने मांडलिकत्व पत्करायचे किंवा युद्ध करायचे. आणि अशा रीतीने प्रेमाने किंवा शास्त्राच्या बळावर राजाने पृथ्वीपती व्ह्यायचे. शेवटी सर्व पृथ्वी जिंकली कि मग त्याचा अश्वाच्या डोक्याचा हविर्भाग यज्ञामध्ये अर्पण करायचा आणि मग राजा झाला चक्रवर्ती! त्यावेळी आणि अजूनही वाटते की या जिंकण्याच्या महात्वाकांक्षेमध्ये अश्वाचा बळी का? तय अश्वाला काहीच काळात नाही तो आपला धावत असतो डोळ्याला झापडे लावून दुसर्याच कोणाची महत्वाकांक्षा पूर्ण करायला! त्याला काळातही नाही कि त्याचा बळी कधी गेला आहे. जेंव्हा त्याची निवड होते अश्वमेधाचा घोडा म्हणून, त्याला वाटते की सर्वोच्च सन्मान त्याला मिळाला आहे. पण खरी मेख शेवटपर्यंत काळातच नाही. तो धावतो, पाळतो आणि पृथ्वी जिंकतो आणि शेवटी बापडा बळी जातो.
3 Idiots पाहून जाणीव झाली कि आपण सारेच त्या घोड्यासारखे आहोत. धावतोय धावतोय पण काळातच नाहीये कशासाठी आणि कुठवर धावायचे. आई बाबा म्हणतात म्हणून, मित्र करतात म्हणून, शेजारी सांगतात म्हणून किंवा TV दाखवतात म्हणून झापडे लवून आपण धावतोय. पैसे मिळतात, घर मिळते, गाडी येते पण आनंद येतो का? आनंदाची गरजच काय जेंव्हा १ कोटी रुपयाचा बंगला मुलगा बांधतो. सकाळी ८ ते रात्री ८ काम करा. घरी या आणि बाहेरून जेवायला मागवा. शनिवार रविवार कुठारी सहल करा. आईकायला एकदम छान वाटते पण कार्याला काय? तेच तेच करून कंटाळा येत नाही का? आणि मुळातच का आपण हे करतो आहे याचा विचार कुठे जातो? मान्य आहे कि पैसा हवा आहे, मान्य आहे की घर हवे आहे आणि परदेश मध्ये फिरायला सुद्धा. पण हे करताना आपल्याला काय नक्की साधायचे आहे याचा विचार? मी हे करतो कारण मला हे आवडते हे कधी कळणार? २२ व्या वर्षी खूप पैसा देईल ते शिक्षण आणि २६ वर्षी जे साध्या होईल तो विक्रम? आणि ५० व्या वर्षी सगळे करून झाल्यावर उरेल ते काय? आणि या सर्व वर्षांची मोजदात करताना गेले ते काय?? आयुष्य!!! अश्वमेध करायला सुरुवात केली आणि कळलेच नाही की उर फुटून धावताना बळी कधीच गेला आहे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment